गोंदिया दि.१७ :पूर्व मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात येणारा धनबाद – चंद्रपुरा हा रेल्वे मार्ग कायमचा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत येणार्या या मार्गावरील ६ एक्सप्रेस गाड्या आता रद्द करण्यात आल्या आहेत.
झरिया कोळसा खाणींमध्ये आग लागल्यानंतर तसेच कोळसा मंत्रालयाच्या पाहणीनंतर रेल्वे मंत्रालयाने धनबाद- चंद्रपुरा हा मार्ग प्रवाशी तसेच माल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला व १५ जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी झाली आहे. हा मार्ग बंद झाल्यामुळे ७ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत, तर १३ एक्सप्रेस व ६ पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यातील ६ एक्सप्रेस गाड्या दपूमरेमधून जाणार्या आहेत.दपूमरेमधून जाणार्या रद्द झालेल्या गाड्या – कंसात गाडी रद्द झाल्याचा दिनांक- १७00७ सिकंदराबाद- दरभंगा (१३ जून), १७00८ दरभंगा – सिकंदराबाद (१६ जून), १७00५ हैदराबाद – रक्सोल (१५ जून), १७00६ रक्सोल- हैदराबाद (१८ जून), १३४२५ माल्दा टाऊन- सुरत (१७ जून), १३४२६ सुरत- माल्दा टाऊन (१९ जून). या गाड्यांसाठी ज्यांनी आधीच आरक्षण केले असेल त्यांचे पैसे रेल्वेच्या नियमानुसार परत केले जातील, असे दपूमरेने कळविले आहे.





