24.4 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ चिमूर तालुक्यात प्रथमच उपग्रहाद्वारे रस्त्यांचे सर्व्ह

चिमूर तालुक्यात प्रथमच उपग्रहाद्वारे रस्त्यांचे सर्व्ह

0
19

चिमूर,दि.17- चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किर्तीकुमार भांगडीयानी मतदारसंघातील विकास कामासाठी 375 कोटी रुपयाचा निधी शासनाकडून मंजूर केला असून चिमूर तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचे उपग्रहद्वारे सर्वेक्षणही करण्यात येणार आहे.मतदारसंघातील शंकरपूर- महालगाव -भिसी-चिमूर -पळसगाव रस्त्याचे कामासाठी आमदार  भांगडीयांनी ३७५ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला.त्या महामार्गाचे सर्व्हचे काम नुकतेच उपग्रहद्वारे शंकरपूर पासून सुरुवात करण्यात आले आहे.चिमूर तालुक्यात पहिल्यांदाच अशी मोजणी होत असून रस्त्याच्या मध्यबिंदूपासून दोन्ही बाजूला 150 मीटर रुंदीची पाहणी सर्वेद्वारे केली जाते. रस्त्याच्या प्रत्येक सहा मीटर अंतरावर फोटो घेतले जात असून एका किमीमागे १००८ रुपये एवढा खर्चे सर्वेला येत असून सर्वेचे हे वाहन ४० किमी वेगाने जाऊन सर्व्हे करीत आहे.उपग्रहाद्वारे घेतलेले छायाचित्र बंगलोर येथील मुख्यालयात पाठवून रस्ता बांधणीचा नकाशा तयार केला जात आहे.आमदार भांगडीयांच्या कार्याबद्ल  भाजप तालुका अध्यक्ष डा दिलीप शिवरकर  विनोद अढळ, एकनाथ थुटे, आकाश डाहूले विकी कोरेकर,सौ पायल कापसे,शरद गिरडे  अनिल शेंडे,अवि बारोकर आदीनी अभिनंदन केले आहे.