28.9 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ वीज कोसळल्याने चार शेळ्यांचा मृत्यू

वीज कोसळल्याने चार शेळ्यांचा मृत्यू

0
19

अहेरी, ,दि.१७: वीज कोसळल्याने चार शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास वांगेपल्ली येथे घडली. आज वांगेपल्ली परिसरात बकऱ्या चरावयास गेल्या होत्या. दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक वादळ व विजांच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस पडण्यास सुरुवात झाली. एवढ्यात वीज कोसळल्याने चार शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. यात मल्लेश भिमय्या पेंदाम व आनंदराव जग्गा सडमेक यांच्या प्रत्येकी दोन शेळ्यांचा समावेश आहे. माहिती मिळताच तलाठी एम. आर. शेख यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. आपद्ग्रस्तांना शासनाने तत्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.