39 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home क्रीडा पालकमंत्र्यांच्या हस्ते फुटबॉल प्रचार-प्रसाराचा शुभारंभ

पालकमंत्र्यांच्या हस्ते फुटबॉल प्रचार-प्रसाराचा शुभारंभ

0
19

blank

गोंदिया,दि.१० : पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते १० जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने गोंदिया जिल्हा मिशन-१ मिलियन फुटबॉल प्रचार-प्रसाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, जिल्हा क्रीडा अधिकारी शुभाष गांगरेड्डीवार, क्रीडा अधिकारी अनिल निमगडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
अवघा महाराष्ट्र फुलबॉलमय करण्यास जिल्ह्यात फुटबॉल या खेळाचा व्यापक प्रचार-प्रसार करण्याच्या दृष्टीने हे मिशन उपयुक्त ठरणार असून जिल्ह्यात सुध्दा चांगले फुटबॉलपटू तयार होण्यास या मिशनची मदत होणार असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले. पालकमंत्री बडोले, जिल्हाधिकारी काळे, पोलीस अधीक्षक डॉ.भूजबळ यांनी फुटबॉलला किक मारुन या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी क्रिडा अधिकारी कार्यालयातील कर्मचारी श्री.उईके, श्री.बारसागडे व क्रीडापटू तसेच क्रिडाप्रेमी उपस्थित होते.

blank