
नागपूर,दि.31-प्राधिकरणांच्या निवडणुकांच्या पदवीधर मतदार नोंदणीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पुन्हा ५ सप्टेंबरपयर्ंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यानंतर मुदतवाढ नाही, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले आहे.
आधी १५ दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर आता पदवीधरांच्या १0 जागांसाठी अर्ज सादर करण्याची सोमवारी शेवटची तारीख होती. मात्र, अद्यापही अर्ज भरताना निर्माण होणार्या तांत्रिक समस्या संपल्या नसल्याने बर्याच प्रमाणात अर्ज भरल्याचे राहून गेले. या कारणाने माजी सिनेट सदस्य महेंद्र निंबार्ते यांच्या नेतृत्वातील सदस्यांनी कुलगुरूंना निवेदन सादर करीत नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.
त्यावर कुलगुरू डॉ. सि.प.काणे यांनी नोंदणीला मुदतवाढ दिली आहे. विद्यापीठाद्वारे पदवीधर नोंदणीची १२ जुलैपासून सुरुवात करण्यात आली. शुक्रवारपयर्ंत (११ ऑगस्ट) पदवीधर झालेल्या मतदारांना त्याची ऑनलाइन नोंदणी करून नोंदणी केलेले अर्ज १६ ऑगस्टपयर्ंत निर्धारित शुल्कासह विद्यापीठात जमा करावे लागणार होते. ऑनलाइन अर्ज भरताना, पदवीधरांना बर्याच तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यानुसार ८ ऑगस्टपयर्ंत नोंदणीस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. ३१ ऑगस्टपर्यत पदवीधरांना ह्यहार्डकॉपी देणे बंधनकारक करण्यात आले होते. संकेतस्थळावर जुन्या नोंदणीकृत पदवीधरांची माहिती असलेली सॉफ्टकॉपीही देण्यात येणार असल्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र, सोमवारी (२८ ऑगस्ट) सकाळपयर्ंत नोंदणी केलेला अर्जांची कॉपी ‘पीडीएफ’ स्वरुपात उपलब्ध होत नसल्याची बाब कुलगुरूंच्या निदर्शनास आणून देण्यात आली. कुलगुरूंनी संघटनांची मागणी मान्य करून ५ सप्टेंबरपर्यत ऑनलाईन नोंदणी आणि ७ सप्टेंबरपर्यत ‘हार्डकॉपी’ जमा करता येणार आहे. आतापर्यंत विद्यापीठात १४ हजार ५00 पदवीधरांनी नोंदणी केली आहे.





