बॉम्बे हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह सापडला

0
17

मुंबई,दि.31-  मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसात बॉम्बे हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. दीपक अमरापूरकर बेपत्ता झाले होते. मंगळवारपासून बेपत्ता असलेल्या डॉ.अमरापूरकर यांचा मृतदेह गुरूवारी सकाळी वरळी कोळीवाडा समुद्र किनारी  सापडला आहे. वरळी कोळीवाडा परिसरातील काही लोकांना समुद्र किनारी एक मृतदेह आढळून आल्यावर त्यांची पोलिसांना याबद्दलची माहिती दिली होती. त्यानंतर पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा तो मृतदेह डॉ. अमरापूर यांचा असल्याचं आढळून आले आहे