35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home क्रीडा फुटबॉल मिशन १ मिलियन कार्यक्रममुख्याध्यापक, तालुका संयोजक व क्रीडा शिक्षक सभा

फुटबॉल मिशन १ मिलियन कार्यक्रममुख्याध्यापक, तालुका संयोजक व क्रीडा शिक्षक सभा

0
30

blank

गोंदिया,दि.१४ : पुंजाभाई पटेल बी.एड.कॉलेज येथे ११ सप्टेबरला शिक्षणाधिकारी प्रफुल कचवे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील मुख्याध्यापक तसेच सर्व तालुक्याचे तालुका संयोजक यांची सभा संपन्न झाली. तसेच गोंदिया शहरातील सर्व क्रीडा शिक्षकांची सभा जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडली.
शिक्षणाधिकारी प्रफुल कचवे यांनी सर्व मुख्याध्यापक यांना १४ ते १५ सप्टेबर रोजी फुटबॉल मिशन १ मिलियन अंतर्गत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले व फुटबॉल सामने यशस्वी करण्याकरीता शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक ‍जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांनी केले. यावेळी फुटबॉल मिशन १ मिलियन उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील शाळा/महाविद्यालयात फुटबॉलचे प्रदर्शनीय सामने खेळण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंना शुभेच्छा देण्याकरीता शुभेच्छा संदेश, चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा अधिकारी अनिल निमगडे, मनोज पंधराम, राज्य क्रीडा मार्गदर्शक नाजुक उईके यांनी सहकार्य केले. तसेच उपशिक्षणाधिकारी श्री.मांढरे, अधीक्षक श्री.मोटघरे, फुटबॉल संघटनेचे श्री.खुर्शीदभाई यांनी सहकार्य केले.

blank