मानवी समाजाचा विकास हा भाषेने झालेला आहे-राष्ट्रपती रामनाथ कोविंद

0
26

नवी दिल्ली, 14 : मानवी समाजाचा आतापर्यंतचा विकास हा भाषेने झालेला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे केले.येथील विज्ञान भवनात केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राजभाषा विभागाच्यावतीने ‘हिंदी दिवस 2017’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रपती रामनाथ कोविंद  होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग हे होते. यासह केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर आणि कीरेन रिजिजू तसेच राजभाषा विभागाचे सचिव प्रभास कुमार झा मंचावर उपस्थित होते.
राष्ट्रपती श्री कोविंद म्हणाले, मानवी समाजाच्या विकासात भाषा महत्वाची असून भारताने याबाबत मोठी जबाबदारी निभावली आहे. आपल्या देशात नालंदा सारखे विश्वस्तरीय विद्यालय होते. जेथे देश विदेशातून लोक ज्ञान संपादन करण्यासाठी येत असत. भारतात विविध भाषांचे अस्तित्व पुर्वापारपासून होते आणि आजही आहेत. देशभरात हजाराच्यावर बोली भाषा असून प्रमुख संपर्क भाषा म्हणून हिंदी भाषेचा विकास झालेला आहे. संपूर्ण रतभर आज हिंदी ही भाषा बोलली, समजली, लिहिली जाते.  हिंदी भाषा सोपी,
सहज, आणि समृद्ध अशी भाषा आहे. भारतीय स्वातंत्र्य लढयात सर्वांना जोडणारी भाषा म्हणून हिंदी भाषेचा उपयोग करण्यात आलेला होता. त्याकाळी हिंदी  भाषा जनसमाजाची भाषा झाली होती, असेही श्री कोविंद म्हणाले.हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला असून जग भरातील 175 विश्वविद्यालयात हिंदी शिकविली जात असल्याचे श्री कोविंद यांनी नमूदकेले. हिंदी विकसित करण्यामध्ये हिंदी साहित्यिकांनी मोठी भूमिका निभावली आहे. याप्रसंगी ‘लीला मोबाईल ॲप’ चा शुभारंभ करण्यात आला. या ॲपमुळे हिंदी शिकणे अधिक सोयीस्कर होईल. वर्ष 2016-17 चे राजभाषा कीर्ती पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले.

कोकण रेल्वे कॉरपोरेशन लिमिटेडला सार्वजनिक क्षेत्र उपक्रमात जास्तीत जास्त राजभाषेचा उपयोग करण्यासाठी ‘ख’ क्षेत्रामधील तृतीय राजभाषा कीर्ती पुरस्कार 2016-17 पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कोकण रेल्वे कॉरपोरेशनचे  अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी हा पुरस्कार स्वीकारला. भारत सरकारचे महामंडळ, स्वायत्त संस्था, ट्रस्ट, सोसायटी आदींच्या श्रेणीअंतर्गत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला हिंदी देवनागरी लिपीचा अधिकाधिक कार्यालयीन कामकाजात वापर करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामाकरिता  राजभाषा कीर्ती व्दितीय पुरस्कार 2016-17 राष्ट्रपती श्री कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे उपाध्यक्ष नीरज बंसल यांनी स्वीकारला.प्रत्येक जिल्ह्यात नगर राजभाषा कार्यान्वयन समिती असून, या समितीच्या माध्यमातून हिंदीचा प्रचार-प्रसार केला जातो. यामध्ये अतिशय उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मुंबई नगर राजभाषा कार्यान्वयन समितीला ‘ख’ क्षेत्रासाठी पुरस्कृत करण्यात आले. हा पुरस्कार  मुंबई नगर राजभाषा कार्यान्वय समितीचे अध्यक्ष मुकेश कुमार सुराणा यांना तसेच सदस्य सचिव रामविचार यादव यांना प्रदान करण्यात आला.