36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ दतोरा गावाच्या विकासासाठी भाजपा पाठीशी-दीपक कदम

दतोरा गावाच्या विकासासाठी भाजपा पाठीशी-दीपक कदम

0
45

blank

गोंदिया,दि.22-नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक मध्ये भाजप पक्षाचा  पराजय झाला असला तरी खचून न जाता दतोरा गावाच्या विकासासाठी भारतीय जनता पक्ष पाठिशी राहणार असल्याचे विचार भाजप नेते व मजुर सहकारी संघाचे उपाध्यक्ष दिपक कदम यांनी मंडई निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.ते म्हणाले की या निवडणुकीत  भाजपा समर्थीत सरपंच व सदस्य कमी असले तरी भाजपा नेहमी दतोरा गावाच्या विकासासाठी कटीबद्ध  राहणार आहे.याप्रसंगी मंचावर दतोराचे सरपंच रोशन पाथोडे, मधू हेमने,राजेन्द्र चूटे,पत्रकार संजय राऊत यांच्यासह गावातील वयोवृद्ध गावकरी,ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी संस्थाचे अध्यक्ष व संचालक माजी सरपंच सहीत अनेक गावकरी उपस्थित होते. मावळते संरपंच रोशन पाथोडे यांनी गावात रस्त्यावरील खांबावर विद्युत लाईट लागणार व वयोवृद्ध गावकरी बसण्यासाठी 40 ठिकाणी खुर्ची लागणार असल्याची माहिती दिली.कार्यकर्त्यांनी पराभवाने खचून न जाता उत्साहाने कामाला लागावे असे आवाहनही त्यांनी केले.

blank