25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home Top News पाकिस्तानी रेंजर्सचा भारतीय चौक्यांवर गोळीबार

पाकिस्तानी रेंजर्सचा भारतीय चौक्यांवर गोळीबार

0
34

जम्मू – जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) चौक्यांवर आज (रविवार) सकाळी पाकिस्तानी रेंजर्सकडून गोळीबार करण्यात आला.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू जिल्ह्यातील आरएस पुरा सेक्टरमधील बीएसएफच्या जोगवाना पोस्टवर आज सकाळी पाकिस्तानी सैन्याकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. सुमारे पंधरा मिनिटे चाललेल्या गोळीबारात पाककडून आधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आला. या गोळीबाराला बीएसएफच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले.

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारत दौऱ्यावर आले असून, त्यापूर्वीच पाककडून हा गोळीबार करण्यात आला आहे. ओबामांच्या दौऱ्यामुळे लष्कराकडून सीमेवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.