ओबामांची गांधीजींना आदरांजली; भारतात आगमन

0
12

नवी दिल्ली, दि. २५ – तीन दिवसीय भारत दौ-याकरिता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे रविवारी सकाळी दिल्लीतील विमानतळावर आगमन झाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः दिल्ली विमानतळावर जाऊन ओबामांचे स्वागत केले. ओबामा यांच्यासोबत त्यांची पत्नी मिशेल यादेखील भारतात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेसबुकवर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची घेतलेल्या गळाभेटीचा फोटो अपलोड केल्यानंतर त्याला फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने लाईक केले आहे.ओबामा यांचे आज (रविवार) सकाळी दिल्लीतील पालम विमानतळावर आगमन झाल्यानंतर मोदींनी त्यांचे स्वागत केले होते. यावेळी ओबामा आणि मोदी यांची गळाभेट झाली होती. या भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी हा फोटो आपल्या फेसबुक अकाउंटवर अपलोड केला होता.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे रविवारपासून भारत दौ-यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिष्टाचार बाजूला ठेवून ओबामांच्या स्वागतासाठी दिल्ली विमानतळावर आले. सकाळी पावणे दहाच्या सुमारास ओबामा यांचे एअरफोर्स वन हे विमान दिल्लीतील पालम विमानतळावर उतरले. यानंतर मोदींनी ओबामा आणि त्यांचे पत्नी मिशेल यांचे स्वागत केले
ओबामांची गांधीजींना आदरांजली; लावला बोधीवृक्ष
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आज (रविवार) दुपारी राजघाट येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. तसेच ओबामांनी राजघाटाजवळ बोधीवृक्षाचे रोपटही लावले.
बोधीवृक्षाखाली भगवान गौतम बुद्धांनी विद्या आत्मसात केली होती. बोधीवृक्ष हे शांततेचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे ओबामा यांनी बोधीवृक्षाचे रोपटे लावून शांततेचा संदेश दिला आहे. राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनर स्वीकारल्यानंतर ओबामा थेट आपल्या ताफ्यासह राजघाट येथे दाखल झाले.
राजघाट येथे त्यांनी प्रथम महात्मा गांधीजींच्या समाधीला पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिती. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय उर्जामंत्री पियूष गोयल उपस्थित होते.