25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ भोई समाज क्रांती दल जिल्हाध्यक्षपदी विकास मेश्राम

भोई समाज क्रांती दल जिल्हाध्यक्षपदी विकास मेश्राम

0
36

अर्जुनी मोरगाव,दि.30ःशिर्डी येथे २९ आॅक्टोंबरला पार पडलेल्या राष्ट्रीय भोईसमाज क्रांती दलाच्या तिसर्या  राष्ट्रीय अधिवेशनात गोंदिया जिल्हा भोई समाज क्रांती दलाच्या जिल्हाध्यक्षपदावर विकास मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली.ही नियुक्ती राष्ट्रीय क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब बावने, युवा मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश उखंडे,प्रदेश सरचिटणीस तुषार साटोटे आणि कार्याध्यक्ष विशालजी डुकरे यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे.मेश्राम यांच्या नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.