25.3 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ सोनी येथे कार्तिक पोणिमेनिमित्त दुय्यम लावणीचा कार्यक्रम

सोनी येथे कार्तिक पोणिमेनिमित्त दुय्यम लावणीचा कार्यक्रम

0
41

गोरेगाव,दि.०७: तालुक्यातील सोनी येथे नवयुवक मंडळ बाजार चौक व ग्रामस्थांच्यावतीने कार्तिक पोर्णिमेच्या निमित्ताने ४ व ५ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक़्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ४ नोव्हेंबरला माजी पोलीस पाटील रामरतन बघेले यांच्या अध्यक्षतेखाली डोमाजी बोपचे यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलीत करण्यात आली. तर ५ नोव्हेंबरला सरपंच उषाताई वलथरे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच अशोक पटले यांच्या हस्ते ज्योत विसर्जीत करण्यात आली. त्यानंतर रात्रीला दुय्यम नक्कल लावणी व शाहरी मुकाबल्याचे आयोजन करण्यात आले होते.. सोबतच दिवसा मंडई निमित्त आयोजित दंडार कार्यक्रमाचे उद्घाटन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तिलकचंद पटले यांच्या हस्ते प्रकाश बघेले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. रात्रीला आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते शाहरी मुकाबल्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य लिनाबाई बोपचे व इतर मान्यवर उपस्थित होते.