आर्णी,दि.09 : तालुक्यातील झापरवाड़ी शिवारातील शेतात आज(दि.9) दुपारी 12 वाजेच्या सुमारास काम करीत असतांना महादेव कुमरे यांच्यावर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली.महादेव कुमरे (वय 52) रा. धानोरा ता. माहुर येथील शेतकऱ्याची शेतजमीन झापरवाड़ी येथे आहे. ते नेहमी प्रमाणे शेतात आले. अचानक त्याच्यावर जंगली अस्वलाने हल्ला केला. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने शेजारील शेतकऱ्यांनी सावळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविले.परंतु प्रकृती गंभीर असल्याने शिवसैनिकांनी रुग्णवाहिका बोलावून यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी नेले.





