हिमाचल विधानसभा निवडणुकीसाठी 74 टक्के मतदान

0
21
नवी दिल्ली,दि.09(वृत्तसंस्था)– हिमाचल विधानसभा निवडणुकीच्या 68 जागांसाठी गुरुवारी मतदान झाले. यंदा गेल्यावर्षीपेक्षा मतदानाची टक्केवारी एका टक्क्याने वाढली आहे. यावेळी 74 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.निकालांची घोषणा 18 डिसेंबरला होणार आहे. या निवडणुकीत 337 उमेदवार मैदानात होते, त्यापैकी 62 विद्यमान आमदार आहेत. भाजपकडून प्रेम कुमार धूमल आणि काँग्रेसच्या वतीने वीरभद्र सिंह हे सीएम कँडिडेट आहेत. धूमल विद्यमान मुख्यमंत्री असून ते अर्कीमधून निवडणूक लढवत आहेत.
किन्नाेर जिल्ह्यातील काशा मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी मतदान पथकाला प्रथम २५ किमीचे अंतर पार करावे लागेल. राज्यात किन्नाेरचे काशा मतदान केंद्र मुख्य रस्त्यापासून सर्वात दूर असलेले केंद्र अाहे. तेथे ४७२ मतदाते अाहेत. तसेच राज्यात १७ मतदान केंद्रे अशी अाहेत, जेथे १००हून कमी मतदाते अाहेत.
 हिक्कीम देशात सर्वात उंचावरील मतदान केंद्र
लाहाैल स्पिती जिल्ह्यातील हिक्कीम हे देशातील सर्वात उंचीवरील मतदान केंद्र अाहे. तेथे कर्मचारी १४,५६७ फूट उंचीवर मतदान करवून घेतील. तेथे १९४ मतदाते अाहेत. यासह चंबामधील टेपा हे मतदान केंद्र १२,००० फूट उंचीवर असून, तेथे ४३९ मतदाते अाहेत.
राज्यात १२ दिवस चाललेल्या निवडणूक प्रचारात भाजप व काँग्रेसच्या स्टार प्रचारकांनी २६० सभा घेतल्या. त्यात काँग्रेसने ६५, तर भाजपने १९७ सभा घेतल्या. तसेच माेदी यांनी राज्यातील १२ पैकी ५ जिल्ह्यांत ७ व अमित शहांनी ८ सभा घेतल्या. प्रेमकुमार धुमल यांनी एकट्यानेच ३८ प्रचारसभा घेतल्या. काँग्रेसकडून राहुल गांधींनी एका दिवसात तीन व वीरभद्र सिंह यांनी ४९ सभा घेतल्या.