शासकीय धान्याची साठवणूक गोदामावर धाड

0
9

वर्धा,दि.09ः- वर्धा पोलिसांच्या विशेष पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर शासकीय धान्याचा अवैधसाठा करुन ठेवलेल्या एका गोदामावर पोह्वा सलाम कुरेशी पथकाने धाड घालून केलेल्या कारवाईत अवैधरीत्या साठवलेले सरकारी धांन्य जप्त केले आहे.सदर गोडावूनमध्ये अवैधरीत्या साठवणुकीचे स्वस्त धान्य गहू भरून असलेले सरासरी ५० किलो वजनाचे २०२ पोते, सरकारी स्वस्त धान्याचे खाली पोते, पोत्यांच्या शिलाईकरीता शिलाई मशीन इत्यादी असा एकूण किंमत ३,८६,५५० रुपयाच्या मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला. आरोपीला ताब्यात घेवून स्वस्त धांन्याच्या अवैध साठवनुकीकरीता आर्वी पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक ११२१/१७ कलम ३, ७ जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात स्वस्त धांन्याच्या अवैध तस्करीची व्यवसायास मोठी खीळ बसली असून यासंबंधाने या व्यवसायात सहभागी असणारे मोठे मासे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. आर्वी पोलीस स्टेशन येथील सपोनि जितेंद्र चांदे व आर्वी पोलीस स्टाफच्या मदतीने ओम ट्रेडर्सचा गोडावूनमध्ये छापा घातला असता सदर ट्रेडर्सचा मालक नामे नीरज सुरेश जोशी, रा. स्टेशन वार्ड, आर्वी हा गोडावूनमध्येच सापडला.