24.8 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ पिपरखारीच्या सरपंचपदी गंगासागर तर उपसरपंचपदी भोगारे आरूढ

पिपरखारीच्या सरपंचपदी गंगासागर तर उपसरपंचपदी भोगारे आरूढ

0
24

चिचगड,दि.१४- देवरी तालुक्यातील पिपरखापरी ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे धनश्री गंगासागर यांची सरपंच पदावर निवड झाली आहे. तर उपसरपंचपदावर काँग्रेसचेच मुनेश्वर भोगारे यांची वर्षी लागली आहे.
नऊ सदस्यीय पिपरखारी ग्रामपंचायतीसाठी गेल्या १६ ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस समर्थित पॅनेलचे सहा, भाजप समर्थित पॅनेलचे दोन तर एक अपक्ष सदस्य निवडून आले. सरपंच पदासाठी घेण्यात आलेल्या थेट निवडणुकीत धनश्री धन्नुलाल गंगासागर या निवडून आल्या. गेल्या ११ तारखेला उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये मुनेश्वर भोगारे यांची उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली.
नवनियुक्त सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांचे माजी जि.प. सदस्य मीना राऊत, धनीराम भोयर, रामेश्वर कपुरडेहरिया, महेंद्र अंबादे. छन्नू उसेंडी, आसाराम आत्राम, धनराज कुंभरे आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.