33.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ गोरेगाव तालुक्यातील आपादग्रस्तांना धनादेशाचे वितरण

गोरेगाव तालुक्यातील आपादग्रस्तांना धनादेशाचे वितरण

0
25

blank

गोरेगाव,दि.१८ ः- गेल्या मे महिन्यात आलेल्या वादळी  वाऱ्यामुळे झालेल्या वित्तहानीच्या मोबदल्याचे धनादेश तहसिल कार्यालय गोरेगावच्या वतीने बाधित आपदग्रस्तांना तिरोडा-गोरेगाव मतदारसंघाचे आमदार विजय रहागंडाले यांच्या हस्ते आज शनिवारला वितरित करण्यात आले.२१ मे २०१७ वादळी वाऱ्यामुळे झालेल्या वित्तहानी पोटी गोरेगाव तालुक्यातील एकूण ११६५ आपद्ग्रस्तांना विशेष बाब म्हणून एकूण ३१ लक्ष ६ हजार ५० रुपयाचे धनादेश आमदार रहांगडाले यांचे हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सभापती दिलीप चौधरी, तिरोडाचे उपविभागीय अधिकारी गंगाधर तळपाडे,तहसीलदार कल्याणकुमार डहाट,पंचायत समिती  सदस्य पवन पटले,बाजार समितीचे संचालक डेमेंद्र रहागंडाले,नायब तहसिलदार नागपूरे,पंचायत समितीचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

blank