24.2 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ वनविभागाच्या जागेत सीएमजेएसवाय रस्ता बांधकाम

वनविभागाच्या जागेत सीएमजेएसवाय रस्ता बांधकाम

0
31

तुमसर,दि.25 : तुमसर वनपरिक्षेत्रांंतर्गत सौदेपूर ते खैरटोला दरम्यान मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत ६ कि़मी. रस्ता तयार करण्यात येत असून वनविभागाच्या जागेतून खोदकाम केल्यामुळे संबंधित कंत्राटदाराविरूद्ध तुमसर वनपरिक्षेत्राधिकारी यांनी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे एकच खळबळ माजली आहे. तत्पूर्वी वनपरिक्षेत्राधिकारी यांनी येथे काम बंद केले होते. नंतर काम सुरू करण्यात आले. त्यानंतर येथे गुन्हा दाखल करण्यात आला. हे विशेष.
तुमसर तालुक्यातील सोदेपूर-खैरीटोला दरम्यान ६ कि़मी. लांबीचा रस्ता तयार करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत हा रस्ता तयार करण्यात येत आहे. येथे कंत्राटदाराला साडे सात मीटर रूंदीमध्ये रस्ता तयार करायचा होता. मात्र कंत्राटदाराने वनविभागाच्या हद्दीतील जागेत रस्ता तयार करत खोदकाम केला आहे.
याची माहिती प्राप्त होताच तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी माहिती प्राप्त होताच मोक्का चौकशी करून संबंधित कंत्राटदाराविरूद्ध वनअधिनियम १९२७ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

blank