28.7 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ आमगावात आजी माजी आमदार खासदारांच्या सूनामध्ये रंगणार सामना

आमगावात आजी माजी आमदार खासदारांच्या सूनामध्ये रंगणार सामना

0
16

आमगाव,दि.26ः-आमगाव नगरपरिषदेची निवडणूक येत्या १३ डिसेंबरला होणार असून उमेदवारी अर्ज सादर करण्याचा २४ नोव्हेंबर रोजी शेवटचा दिवस असताना सर्वच पक्षातील उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. सुरुवातीला उमेदवारी जाहीर करण्यास दक्षता घेणार्‍या सर्वच राजकीय पक्षांनी शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदाकरिता ९ उमेदवारी अर्ज सादर केले. तर १0 प्रभागातील २0 जागेकरिता १0९ व्यक्तींनी उमेदवारीचा दावा ठोकला. विशेष म्हणजे येथील नगराध्यक्षपदाची निवडणुक प्रतिष्ठेची ठरणार आहे.भाजपचे माजी खासदार व माजी अर्थमंत्री प्रा.महादेवराव शिवणकर यांची सून राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर माजी आमजार व बाजार समितीचे सभापती केशवराव मानकर यांची सून भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या रिगंणात असल्याने चूरस निर्माण झाली आहे.भाजपने आमदार परिणय़ फुके यांना आमगावची जबाबदारी दिली असून निवडणुक काळात ते तीन दिवस आमगावात मुक्कामी राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.तर काँग्रेसकडून काँग्रेसचे निष्ठावान विजय बहेकार यांच्या कुटुबांत उमेदवारी दिली गेली आहे.
आमगाव नगरपरिषदेत एकूण १0 प्रभाग असून प्रत्येक प्रभागाकरीता दोन उमेदवारी याप्रमाणे २0 जागेकरिता ही लढत होत आहे. यात पन्नास टक्के महिलांचा समावेश असून या नगरपरिषदेत महिलांचेच बहुमत राहणार आहे.
नगराध्यक्षाचे पद हे सर्वसाधारण महिलेकरिता राखीव असल्याचे परिषदेत महिलांची एकूण संख्या ११ व पुरुषांची संख्या १0 अशी राहिल, हे विशेष. प्रथमच महिलेला नगराध्यक्षचा बहुमान मिळणार असल्याने सर्वच पक्ष त्यांच्या उमेदवारी जाहीर होण्याची शेवटपर्यंत वाट पाहत होते व सर्वच पक्षांनी आपआपले सर्व्हे करून प्रबळ महिला दावेदार जाहीर करण्यास उशीर केला. परिणामी नामांकणाच्या शेवटच्या दिवसी उमेदवारी अर्ज सादर करण्यास मोठी गर्दी उसळली होती.