25.2 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home मराठवाडा/खान्देश ओबीसी सेवासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी चिंते तर चिटणीसपदी डेंगळे

ओबीसी सेवासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी चिंते तर चिटणीसपदी डेंगळे

0
39

लातूर,दि.29 : लातूर जिल्हा ओबीसी सेवासंघाची बैठक रविवारी नेटीझन्स महाविद्यालयात वामन अंकुश यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत १० डिसेंबर २०१७ रोजी पापळ जि.अमरावती येथे होणा-या ओबीसी सेवासंघाच्या ८ व्या अधिवेशना संदर्भात महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख लक्ष्मण दावणकर, MOTA चे अध्यक्ष ओमप्रकाश जगदाळे, जनार्धन चिंते, सचिन डेंगळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच जिल्हाध्यक्षाचा तीन वर्षाचा कालावधी संपल्यामुळे नुतन जिल्हाध्यक्ष म्हणून जनार्धन चिंते आणि जिल्हाचिटणीस म्हणून सचिन डेंगळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीची सुरूवात संविधानदिनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या बैठकीस लातूर तालुकाध्यक्ष संजय क्षिरसागर,जयकुमार गाडेकर,सचिन मुर्के,नागनाथ चिट्टे, एस.पी.बानापुरे, सी.एस. भोजने,पी.एस. बालकुंदे, जीवन कपडे, भारत काळे यांची उपस्थिती होती. बैठकीचे प्रास्ताविक दावणकर यांनी केले तर सुत्रसंचलन शंकर स्वामी यांनी तर आभार संजय क्षिरसागर यांनी मानले.