38.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News अ‍ॅम्ब्युलन्स व ट्रकदरम्यान भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, पाच जखमी

अ‍ॅम्ब्युलन्स व ट्रकदरम्यान भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, पाच जखमी

0
22

blank

नागपूर,दि. 4 : अकोल्याहून नागपूरच्या मेयो रुग्णालयात येत असलेल्या एका अ‍ॅम्ब्युलन्सला नागपूर शहराच्या लगत असलेल्या आठवा मैल या औद्योगिक वसाहतीच्या क्षेत्रात सोमवारी पहाटे चारच्या सुमारास भीषण अपघात झाला. ही अ‍ॅम्ब्युलन्स व ट्रकच्या झालेल्या धडकेत चार जण जागीच ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात ठार झालेल्यांचे मृतदेह मेयो रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. एका आजारी मुलाला रुग्णवाहिकेतून ​मेयो हॉस्पिटलमध्ये आणले जात होते. या रुग्णवाहिकेला पहाटे साडेतीनच्या सुमारास कोंढाळीजवळ विरुद्ध दिशेकडून भरधाव येणाऱ्या एका ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील चार जण जागीच ठार झाले. तर पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये मुलगा, आई आणि इतर दोघांचा समावेश आहे. तर मुलाचे वडील जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

blank