राहुल गांधींनी भरला उमेदवारी अर्ज, उद्या निवडीच्या घोषणेची शक्यता

0
6

नवी दिल्ली,दि. 4(वृत्तसंस्था)  –काँग्रेस अध्यक्षपदासाठी होत असलेल्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आङे. विद्यमान अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे प्रस्तावक आहेत. निवडणुकीत राहुल गांधी एकमेव उमेदवार असतील आणि त्यांची बिनविरोध निवड होईल असे समजले जात आहे. सोमवारीच उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. रविवारपर्यंत कोणीही या पदासाठी अर्ज दाखल केला नव्हता. पाच डिसेंबरला म्हणजे उद्या अर्जाची छाननी होईल. राहुल गांधींच्या विरोधात कोणीही अर्ज दाखल केला नाही, तर आजच राहुल गांधींची निवड निश्चित होणार आहे. असे झाल्यास काँग्रेस अध्यक्ष बनणारे गांधी-नेहरू कुटुंबातील ते सहावे सदस्य असतील.

रविवारी पक्षाध्यक्ष निवडणुकीशी संबंधित प्रक्रिया आणि 47 वर्षीय राहुल गांधी यांच्या उमेदवारीबाबत पक्ष मुख्यालयात बैठक झाली. पार्टीच्या सेंट्रल इलेक्शन अथॉरिटीचे चेअरमन मुलापल्ली रामचंद्रन आणि मेंबर मधुसूदन मिस्त्रीही उपस्थित होते.दोन्ही नेत्यांनी राज्यांच्या रिटर्निंग अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली. प्रत्येक राज्याच्या युनिटना उमेदवारी अर्जाचा एक एक सेट पाठवण्यास सांगण्यात आले आहे. त्यात राहुल गांधींना अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव असेल.माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि इतर मोठे नेतेही काँग्रेसाध्यक्ष पदासाठी राहुल गांधीच्या नावाचा प्रस्ताव ठेवतील. त्याशिवाय हे नेते राहुल गांधी अर्ज भरतानाही उपस्थित असतील.