37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम

कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम

0
26

blank

गोंदिया,दि.७ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ व नटवरलाल माणिकलाल दलाल विधी महाविद्यालय गोंदिया यांच्या संयुक्त वतीने विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबीर नुकतेच संपन्न झाले. या शिबिरात अपघात दावे, शासकीय योजना, सामाजिक मानसिकता व वकीलांची कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सह‍‍ दिवाणी न्यायाधीश नितीन ढोके म्हणाले, विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जर भविष्यात न्यायीक अधिकारी बनावयाचे असेल तर त्यासाठी आजपासून काय केले पाहिजे त्याबाबत माहिती दिली. परीक्षा कशा होतात याचे त्यांना आलेल्या अनुभवाच्या उदाहरणासह सांगितले. याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल असे सांगितले.
एमएमडी कॉलेजचे प्राचार्य सुयोग इंगळे यांनी सांगितले की, आपण सर्व व्यक्ती समाजाशी जुळले आहोत. ज्या लोकांपर्यंत अधिकार विषयक व कायदेविषयक माहिती पोहोचली नाही तसेच कोर्ट कचेरीचे नाव ऐकताच जे व्यक्ती घाबरतात अशा लोकाना त्यांचे अधिकार, त्यांच्या कर्तव्याची जाणिव करुन देणे तसेच त्यांचे मनोबल वाढविणे आवश्यक आहे. समाजात अनेक अडचणी येत असतात त्या अडचणींना सामोरे जाण्याकरीता प्रत्येक व्यक्तीने प्रयत्नशील असणे आवश्यक आहे, त्यामुळे समस्या मिटू शकतात. रेल्वे स्टेशन, बसस्थानक येथे बरेच लहान मुले फिरतांना किंवा झोपलेले दिसतात अशावेळी त्यांची विचारपूस करुन त्यांना मदत करावी असे सांगितले.
सहायक सरकारी वकील पी.एस.आगाशे यांनी वाहन अपघात प्रकरणांमध्ये रस्त्यांवरील वाहनावरील होणारे अपघात तसेच कारखान्यामध्ये काम करणारे कामगार यांना मशीनचे काम करीत असतांना दुखापत किंवा अपघात झाल्यास न्यायालयात दावा दाखल करु शकतो. मोटार अपघातग्रस्ताला त्यांच्या कुटूंबाला किंवा त्यांना शंभर टक्के क्लेम कायदयामार्फत मिळत असतो. अपघात झाल्यास सर्वप्रथम पोलीस स्टेशनला रिपोर्ट देणे आवश्यक आहे. बरेचसे अपघात हे रोडवरील खड्ड्यांमुळे होत असतात. यासाठी रोड बनविणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर दावा दाखल करु शकतो असे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे आर.जी.बोरीकर, जी.सी.ठवकर, दि.अ.थोरात, एल.पी.पारधी, पी.एन.गजभिये, ए.जे.नंदेश्वर, गुरुदयाल जैतवार, रविंद्र बडगे यांनी सहकार्य केले. संचालन श्रीमती सुनिता पिंचा यांनी केले. उपस्थितांचे आभार सुजाता तिवारी यांनी मानले.

blank