24.4 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ संकटमोचन संघटना जेलभरो आंदोलन करणार- डाॅ. अजयराव तुमसरे

संकटमोचन संघटना जेलभरो आंदोलन करणार- डाॅ. अजयराव तुमसरे

0
26

साकोली,दि.7ः- भंडारा-गोंदिया जिल्ह्यात यावर्षी दुष्काळसदृष्यपरिस्थिती निर्माण झाली असून राज्यसरकारने अद्यापही या जिल्ह्यातील शेतकर्यांना जिल्हे दुष्काळग्रस्त जाहिर करुन मदत केलेली नाही.सोबतच शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविलेल्या नाहीत.गेल्या महिन्यात आंदोलन करुन याकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.परंतु सरकारयाकडे दुर्लक्ष करीत असल्याने अखिल भारतीय शेतकरी संकटमोचन संघटना जेलभरो आंदोलन करणार असल्याचा इशारा डाॅ.अजयराव तुमसरे यांनी दिली आहे.तुमसरे यांनी धानाला 3500/–रू आधारभूत किंमत देण्यात यावी. स्वामिनाथन आयोग तात्काळ लागू करण्यात यावा ( निवडणुकीत दिलेला शब्द पाळावा). उन्हाळी धान पिक शेतक-यांनी घेऊ नये असा सरकारने काढलेला आदेश रद्द करण्यात यावा. भंडारा-गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करून शेतक-यांना मोबदला देण्यात यावा. तुडतुड्याने धान नष्ट केल्यामुळे पिक विम्याची भरपाई देण्यात यावी. कृषी पंपा करीता 24 तास विज देण्यात यावी. वनजमिनीकरीता लावलेली 3 पिढ्यांची अट रद्द करून ताबडतोब पट्टे देण्यात यावे. शेतक-यांना वयाच्या 60 वर्षापासून पेंशन देण्यात यावी. संजय गांधी निराधार योजनेची रक्कम दर महिन्याला खात्यावर जमा करण्यात यावी. ढिवर/भोई समाजाला देण्यात येणा-या तलावांची लिज 400/– रूपये वरून 1800/– रूपये करण्यात आली ती पुर्ववत करण्यात यावे या मागण्यासांठी संघटना रस्त्यावर उतरणार असल्याचे म्हटले आहे.

blank