23.6 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ अवैध रेती उत्खणनाने पुलाला धोका,प्रशासन मौन

अवैध रेती उत्खणनाने पुलाला धोका,प्रशासन मौन

0
21
सडक अर्जुनी,दि.7ः- तालुक्यातील सौन्दड/ पीपरी या  दोन गावांना जोडण्याकरीता शासनाने प्रधानमंत्री सडक योजने अंतर्गत  कोट्यावधी रुपयाच्या निधी मंजूर करून पुलाचे बांधकाम केले.त्यातच चुलबंद नदी पात्रातील रेतीचे मोठ्याप्रमाणात  अवैधरित्या गौण खनिज चोरले असून त्या उत्खणन करताना पुलाच्या खाली खड्डे पडल्यामुळे या पुलाला  वाळू माफियांच्या  अवैधरित्या उत्खननामुळे  धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे पूल कोसळण्याची भिती नागरिकांनी व्यक्त केली असून शासनाच्या निकषानुसार पुलापासून 100 मीटर अंतरावर वाळूचा उपसा करता येत नाही.परंतु तालुक्यातील महसुल अधिकारी,तलाठी व पोलीस प्रशासनाच्या मिलीभगतामूळे वाळूमाफिया खुले आम पुलाखालून रेतीचा उपसा करु लागले आहेत.एकीकडे रेल्वे पूल आहे तर दुसरीकडे प्रधान मंत्री योजनेतून बनवलेले हा बुडीत पूल ठरला आहे.सौन्दड, पिपरी या बंद घाटातून ,शेत शिवारातील  छुप्प्या मार्गाने चोरी केली जात आहे.त्यामुळे शेतमार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. सौन्दड,पिपरी,रांका या तिन्ही गावातील जनतेला रात्रभर वाहनांच्या वाहतुकी मुळे झोपणे कठीण झाले आहे. काही वाहनांना नंबर प्लेट सुद्धा नाही परिणामी अपघात घडला तर तो वाहन/चालक कशा ओळखणार हा प्रश्न सुध्दा उपस्थित झाला आहे.