23.2 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ अधिवेशनात चोख पोलीस बंदोबस्त – पोलीस आयुक्त के व्यंकटेशम

अधिवेशनात चोख पोलीस बंदोबस्त – पोलीस आयुक्त के व्यंकटेशम

0
56

नागपूर,दि.09ः- हिवाळी अधिवेशन २०१७ साठी पोलीस विभाग सज्ज असल्याचे पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांनी सांगितले. आज पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अधिवेशनाच्या बंदोबस्ताची पूर्ण तयारी झाली असून पोलीस विभाग या अधिवेशनासाठी पूर्णपणे तयार असल्याचे सांगत असतांना २७३० पोलीस अधिकारी नागपूर बाहेरून येणार, तब्बल ६००० कर्मचारी या अधिवेशनात कायदे व सुव्यवस्था चोख राहण्यासाठी दिवसरात्र काम करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. सोबतच महत्वाच्या प्रत्येक चौकात सीसीटीव्ही असणार आहेत, तसेच ड्रोन कॅॅमेरा, बॅॅक स्कॅनर, हेल्मेट कॅमेरा, या सारख्या अद्यावत सुरक्षा साधनांचा वापर या अधिवेशनात होणार आहे. या हिवाळी अधिवेशनात जवळपास ९० हून जास्त मोर्चे येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

blank