36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ रुग्णांना औषधी व अन्य सुविधा उपलब्ध करून द्या

रुग्णांना औषधी व अन्य सुविधा उपलब्ध करून द्या

0
18

blank

तुमसर,दि.१२-मागील आठवडाभरापासून दवाखान्यात औषधी, सिरप, इंजेक्शनचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा आहे. गरीब रुग्णांना औषधी व इंजेक्शन बाहेरुन विकत घेऊन आणावी लागत आहे. अशा तक्रारी जनतेकडून येत प्राप्त होत असल्याने, येत्या तीन दिवसात औषधं व अन्य सुविधा उपलब्ध करुण देण्यात यावे. अन्यथा शिवसेनेतर्फे तिव्रआंदोलन करण्यात येईल, असा इशारा शासकीय सुभाषचंद्र बोस, उपजिल्हा रुग्णालय, तुमसरचे वैद्यकीय अधिकारी यांना सोमवारी (दि.११) निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना तुमसर शहर प्रमुख नितिन सेलोकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुधाकर कारेमोरे, तालुका प्रमुख नरेश उचीबघले, उपशहर प्रमुख जगदीश त्रिभुनकर, गुड्डू डहरवाल, कैलाश जलवाने, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अमित एच. मेश्राम, युवासेना उपजिल्हा प्रमुख मनोज चौबे, संजू डहाके, अमित देशभ्रतार, पोमेश पटले, सुनील पारधी, कैलाश गोडबोले यांच्यासह शिवसैनिक मोठय़ासंख्येने उपस्थित होते.

 

blank