
ब्रम्हपुरी,दि.29 : ब्रम्हपुरी-वडसा मार्गावर बाबा फरीद पेट्रोल पंप जवळ मारोती व्हॅनच्या धडकेत कु.किरण रवींद्र ठाकुर (२१) रा.कोथूळना हिला जबर धडक दिल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारला घडली. ती येथील ने.ही.महाविद्यालयाची बी.एस.सि. अंतिम वर्गाची विद्यार्थिनी होती.माहितीनुसार वाहन चालक वकील वामन मैंद हे दुसऱ्याच्या मारोती कारने (क्रमांक महा.३४ ए. ए.६९६७) स्वतः चालवत वडसाकडून ब्रम्हपुरी कडे येत होते. त्याच किरण महाविद्यालयाकडे कोथुळण्यावरून ब्रम्हपुरीला सायकलने जात असताना मारोती व्हॅनने मागेहून धडक दिली.या धडकेने किरणचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झालयाने घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन ब्रम्हपुरी पोलीस निरीक्षक विलास चव्हाण, शिपाई मडावी यांनी पंचनामा करून आरोपी वकील वामन मैंद यांना ताब्यात घेतले आहे.




