मागावर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तत्काळ द्या – राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ

0
15

गडचिरोली,दि.29ः-जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची मागील ३ वर्षा पासून रखडलेली शिष्यवृत्ती लवकरात लवकर मिळावी याकरिता समाज कल्याण आयुक्त मोहतुरे यांची आमदार देवराव होळी सह राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ तसेच भाजप ओबीसी आघाडीने भेट घेतली. समाजातील सर्वात शेवट पर्यंतच्या घटका पर्यंतच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत शिकणार्या मागास प्रवर्गातील ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना भारत सरकार कडून .शिष्यवृत्ती दिल्या जाते. मात्र सत्र  २०१5-१६ , २०१६-१७ व २०१७- २०१८ या तीनही वर्षांची शिष्यवृत्ती, फ्री- शिपची रक्कम अद्यापही न दिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुद्धा झालेले आहे.त्यामुळे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना तत्काळ २० जानेवारी २०१८ च्या आत शिष्यवृत्ती देण्यात  यावी अशी मागणी चर्चेच्यावेळी करण्यात आली. यावेळी १५ जानेवारीच्या आत सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण आयुक्त मोहतुरेनी दिली. यावेळी  ओबीसी महासंघाचे सुरज डोईजड , किरण कटरे , करण ढोरे , विपुल मिसार , साई सिलमवार , लोकमान्य बरडे, भाजप ओबीसी आघाडीचे अध्यक्ष गावंडे, भास्कर बुरे , नंदू नाकतोडे , सुनील पारधी उपस्थित होते.आ.होळी यांनी यावेळी जून महिन्यापर्यंत जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यां करिता वसतिगृहाची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती दिली.