गोंदिया,दि.१७ः- देशातील योजना कर्मचारी व असंघटीत कामगारांच्या मागण्यांना घेऊन आयटकने केलेल्या आवाहनावर आज बुधवारला गोंदिया जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील गटप्रवर्तक आशा कर्मचांèयांचा मोर्चा आयटकच्या नेतृत्वात धडकला.मोच्र्याचे नेतृत्व आयटक जिल्हाध्यक्ष हौसलाल रहागंडाले,सचिव मिqलद गणवीर,रामचं्रद पाटील,शालुताई कुथे व शेखर कनोजिया यांनी केले.जिल्ह्यातील सर्वच आशाप्रवर्तिका या मोच्र्यात सहभागी झाल्याने आरोग्यसेवेवर परिणाम पडला.फूलचूर नाका येथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोचताच सभेत रुपांतर झाले.यावेळी मोच्र्याला संबोधतांना अनेकांनी सरकारच्या धोरणावर कडाडून टिका केली.हा मोर्चा जानेवारी २०१८ पासून १८००० रुपये किमान वेतनाचा कायदा तत्काळ लागू करण्यात यावा.संसदेच्या स्थायी समितीने शिफारस केल्याप्रमाणे ३ हजार रुपये दरमहा मानधन लागू करण्यात यावे.राज्यसरकारने आशांना दरमहा १५०० रुपये मानधन देण्याच्या घेतलेल्या निर्णयाची अमलबजावणी करण्यात यावी.आशा व गटप्रवर्तक महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात यावे.जननी सुरक्षा योजनेतील लाभासाठी दारिद्ररेषेखालील अट रद्द करण्यात यावे.केंद्रसरकारच्या शासन निर्णयानुसार आरोग्य विभागातील कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना ५ टक्के मानधन वाढ व १५ टक्के बोनस देण्याचा झालेला निर्णय गटप्रवर्तकांना लागू करण्यात यावे आदी मागण्यांना घेऊन काढण्यात आला होता.या मोच्र्याचे सभेचे संचालन परेश दुरुगकर यांनी केले.





