22.8 C
Gondiā
Thursday, July 23, 2026
Home विदर्भ समस्यांना घेऊन गोवारी समाजाचे धरणे आंदोलन

समस्यांना घेऊन गोवारी समाजाचे धरणे आंदोलन

0
38
गोंदिया,दि.१७ः- आदिवासी गोवारी संघर्ष कृती समिती गोंडवानाच्यावतीने आज बुधवारला गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजाच्या समस्यांना घेऊन एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात सयोंजक दामोदर नेवारे,जिल्हाध्यक्ष होमराज ठाकरे,गोकूल बोपचे,डी.एम.राऊत,रेखलाल राऊत,जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर,पुरुषोत्तम मोदी, रिपाई प्रदेश उपाध्यक्ष भाऊ गजभिये,संजय राऊत,सुरेश वाघाडे,रामेश्वर वाघाडे,दिनेश शहारे,संतोष कोहळे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.गोवारी समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ठ करुन त्यांच्या शिफारसी लागू करण्यात यावे या मुख्य मागणीसह गोंडगोवारी ही जातच अस्तित्वात नसल्याने यामुळे गोवारी समाजावर सातत्याने अन्याय झाल्याने गोंड गोवारी मधील गोंड शब्द काढून गोवारींना अनु.जमातीमध्ये शामील करण्याची शिफारस आदिवासी आमदार कै.नारायणqसह उईके यांनी काका कालेलकर आयोगाकडे केली होती.परंतु मध्यप्रदेश सरकारने १९५६ मध्ये गोंड गोवारी शब्द करुन अन्याय केल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.२००६ मधील वसंत पाटील यांनी सादर केलेला अहवालाप्रमाणे गोंड-गोवारीना अनुसूचित जमातीच्या सवलतीचा लाभ मिळण्यासाठी आदेश काढण्यात यावे.राज्यशासनाने गोंड-गोवारीएैवजी गोवारी अशी दुरुस्ती करण्याची शिफारस केंद्रसरकारला करावे या मागणीसाठी हे एकदिवसीय आंदोलन करण्यात आले.

blank