23.1 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home विदर्भ अनुसूचित जमाती कल्याण समिती आज गोंदियात

अनुसूचित जमाती कल्याण समिती आज गोंदियात

0
52

गोंदिया,दि.१८ : महाराष्ट्र विधानमंडळच्या अनुसूचित जमाती कल्याण समिती १८ ते २० जानेवारी २०१८ या कालावधीत जिल्ह्याच्या दौèयावर येत आहे. विधानसभा सदस्य डॉ.अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीमध्ये १५ सदस्यांचा समावेश आहे. या समितीकडून जिल्ह्यात विविध शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या आदिवासी विकासाच्या योजनांची पाहणी करण्यात येणार आहे. ही समिती आदिवासी विकासाच्या योजनांचा आढावा देखील घेणार आहे. जिल्हाधिकारी तसेच विविध शासकीय यंत्रणांच्या अधिकाèयांसोबत आदिवासी विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी समितीची बैठक घेणार आहे. १८ जानेवारीला या समितीची लोकप्रतनिधींसोबत सकाळी ९ वाजता शासकिय विश्रामगृहात बैठक सुध्दा आयोजित करण्यात आली आहे.त्यामध्ये जिल्ह्यातील आदिवासी भागात राबविण्यात येत असलेल्या योजनांबाबत आढावा घेतला जाणार आहे.त्यानंतर १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात नगरपरिषद,नगरपंचायत,जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हातील इतर विभागामधील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पद,अनुशेष,जातपडताळणीबाबतचा आढावा घेतला जाणार आहे.विशेष म्हणजे ही समिती १९ जानेवारीला आदिवासी आश्रमशाळा व वस्तीगृहांना भेटी देऊन त्याठिकाणी शासनातर्फे पुरविल्या जाणाèया सोयींचा आढावा तालुकानिहाय घेणार आहे.या समितीमध्ये आमदार प्रभुदास बिलावेकर,पास्कल धनारे,संजय पुराम,डॉ.पंकज भोयर,राजाभाऊ वाजे,शांताराम मोरे,अमित घोडा,डॉ.संतोष टारफे,वैभव पिचड,पांडुरंग बरोरा,गोपिकिसन बाजोरिया,आनंद ठाकूर,चंद्रकांत रघुवंशी,श्रीकांत देशपांडे यांचा समावेश आहे.