31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home मराठवाडा/खान्देश पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषि परिषदेची महत्वाची आढावा बैठक रविवारी.

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषि परिषदेची महत्वाची आढावा बैठक रविवारी.

0
19
नांदेड ,दि.१८ :-पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषि परिषदेची महत्वाची विभागिय आढावा बैठक रविवार 21 जानेवारी सकाळी 12 वाजता शासकिय विश्रामगृह नांदेड येथे आयोजित केली आहे.अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे कें.का.सदस्य डॉ.प्रा.पंजाब चव्हाण तर प्रमुख पाव्हुने मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.सोपानराव क्षिरसागर,कृषि परिषदचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर,प्रदेश संघटक चक्रधर पाटील देवसरकर,विभागिय अध्यक्ष प्रा.विवेक सुकने मराठा सेवा संघाचे नानाराव कल्यानकर,उध्दव पाटील सुर्यवंशी,सतिष जाधव,मराठा उद्योजक कक्षाचे धनंजय पाटील,शंकर पवार आदी मान्यवर उपश्थित राहणार आहेत.
बैठकीत मागिल आढावा,शिवजन्मोत्सव सोहळा,या विषयावर चर्चा होणार आहे.बैठकिस सर्व विभागिय,जिल्हा पदाधिकारी,तालुकाध्यक्ष,तालुका सचिव आदिनी उपश्थित राहावे असे आवाहन कृषि परिषदेचे जिल्हाध्यक्ष नांदेड विनित पाटील हरडफकर,परमेश्वर काळे पाटील,जिल्हाध्यक्ष हिंगोली आविनाश वाघमारे,जिल्हाध्यक्ष परभनी एकनाथ मोरे,जिल्हाध्यक्ष यवतमाळ राम कदम,आदिनी केले आहे.