अंनिस च्या जिल्हाध्यक्षपदी विनोद तायडे 

0
22
आकाश पडघन
वाशिम दि:18- वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथील  पत्रकार विनोद तायडे  यांची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्षपदी अनिस च्या जिल्हास्तरीय बैठकीत एकमताने निवड करण्यात आली.
दि 16 जानेवारीला स्थानिक विश्रामगृह येथे अनिस च्या जिल्हा  स्तरीय बैठकीचे आयोजन पी एस खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले कार्यक्रमाला विदर्भ  विभाग प्रमुख गजेंद्र सुरकार  आणि प्रधान सचिव प्रा उन्मेष घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती .विनोद तायडे यांच्या सामाजिक  कार्याची दखल घेऊन त्याची जिल्हाध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली .सुरकार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला विनोद तायडे महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन चे  जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी यापूर्वी  त्यांनी स्वताचा वाढदिवस चक्क रात्री 12 वाजता शेकडो महिलांच्या उपस्थितीत  स्मशानभूमीत  साजरा केला. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत असताना  त्यांनी बुवाबाजीला आव्हान दिले अंधश्रद्धा निर्मुलन जनजागृती अभियान राबविले त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आल्याने त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.