
भंडारा,दि.१८ :जनहीत सामाजिक सेवाभावी संस्था यांच्या वतीने १७ जानेवारीला खापा येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील आवारात ब्लँकेट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला माजी राज्य शिक्षणमंत्री विलास श्रृंगारपवार उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तर भंडारा विधानसभेचे माजी आमदार अॅड.आनंदराव वंजारी जनहीत सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जनहीत सामाजिक सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी डाॅ.माधवराव म्हस्के, डाॅ.भैय्यालाल गजभिये, के एन नान्हे, अर्जुन सुर्यवंशी, दामोधर क्षिरसागर, प्रविण भोंदे, गोविंदराव चरडे, राजकपूर राऊत, अभिजीत वंजारी, प्रेमलाल लांजेवार, प्रेमराज मोहरकर, सौ.रेणुका धकाते सौ.श्रीनाथ सौ संगीता राठोड, सौ.प्रमिला धकाते, सौ. मोहकर, रमेश भद्रे , प्रकाश थानथराठे, व्यवहारे मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमा प्रसंगी माजी राज्य शिक्षणमंत्री विलास श्रृंगारपवार यांनी पैसा हे जगण्याचे माध्यम नाही, तर पैसाच जीवनाचे सर्वस्व आहे. मिळालेल्या पैशाचा उपयोग समाजातील उपेक्षित वर्गाला जर झाला तर पैश्याचा खरा सद्उपयोग होईल असे विचार व्यक्त केले.भंडाराचे माजी आमदार अॅड.आनंदराव वंजारी यांनी निवृत्ती जीवनाची अंतीम पायरी नाही.
निवृत्ती नंतरही समाजसेवा करण्याची गरज आहे.माझ्या कल्पनेतून विचार केला कि, आपण निवृत्ती नंतर समाजकार्य केले पाहिजे. चार पाच लोकं बसुन विचार केला व आम्ही सर्वानुमते जनहित सामाजिक सेवाभावी संस्थेचे स्थापना केली.कसलेही कार्य करण्याचे धाडस असले व सुरूवात केल्यास समाजसेवा नक्कीच घडते असे विचार त्यांनी व्यक्त केले.
या गावातील प्रत्येक घरी एक ब्लँकेट असे प्रत्येक घरा घरात संस्थे कडून ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
तसेच जनहीत सामाजिक सेवाभावी संस्थेने पलाडी गाव सुद्धा संस्थेच्या मार्फत दत्तक घेवून हे गावाचा विकास करण्याचा ध्यास घेतला आहे.सदर कार्यक्रमाला खापा ग्रामपंचायतचे सरपंच जगदीश उईके, उपसरपंचा सौ.पुजा परतेती, माजी सरपंच तुकाराम कळनायके,इमा काब्रा, संतोष शर्मा व सहकारी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



