24.5 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ खासदार अशोक नेते यांची बापू रंगुवार परिवाराला सांत्वन भेट

खासदार अशोक नेते यांची बापू रंगुवार परिवाराला सांत्वन भेट

0
53

सिरोंचा,दि.28 -जिल्ह्याचे खासदार अशोक नेते यांनी आपल्या सिरोंचा दौरादरम्यान आरडा ग्रामपंचायतचे उपसरपंच बापू रंगुवार यांचे राहते घरी भेट देऊन त्यांच्या कुटुबिंयाचे सांत्वन केले. बापू रंगुवार यांच्या वडीलांचे 4 फेब्रवरीला निधन झाले होते. निधनाची माहिती मिळताच खासदार नेते यांनी दौऱ्यात रंगुवार परिवाराला भेट  दिली.खासदार अशोक नेते  सोबत जिल्हा परिषद गडचिरोली उपाध्यक्ष अजय भाऊ कंकळालवार उपस्थित होते.यावेळी रंगू बापू उपसरपंच आरडा यांचे मोठे भाऊ राजमल्लय्या रंगुवार , वेक्कांना, दुर्गंना, सदाशिव, कमलाकर,नागेश 7 भाऊ संपूर्ण रंगुवार परिवार यावेळीउपस्थित होते.विशेष म्हणजे रंगू बापू हे मागील 25 वर्षा पासून नाविस मध्ये संपूर्ण जिवन निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम करीत आहेत.अशात जिल्ह्याचे पालकमंत्री अंबरीशराव आत्राम सिरोंच्याला येऊनही अश्या दुःखाच्या वेळी बापू रंगुवार यांच्याकडे जाऊन सांत्वन करण्यास  वेळ न काढल्याने आत्राम यांच्याबद्ल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.