28.9 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ भिडे,एकबोटेला अटक करा-बालाजी गंगावणे

भिडे,एकबोटेला अटक करा-बालाजी गंगावणे

0
27
*आकाश पडघन*
वाशिम. दि.4ः भारिप बहुजन महासंघ वाशिम तालुका शाखेच्या वतीने उपविभागिय कार्यालय वाशिम समोर शनिवारला धरणे अंदोलन करुन भिडे व एकबोटेंच्या अटकेची मागणी करण्यात आली.आंदोलन तालुका अध्यक्ष बालाजी गंगावणे यांच्या नेतृत्वात पार पडले. या धरणे अंदोलनात भिमा कोरेगांव दंगलीचा मुख्य सुत्रधार मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांना रासुका अंतर्गत गुन्हे नोंदवुन तात्काळ अटक करावी. तिन जानेवारीच्या महाराष्ट्र बंद दरम्यान निष्पाप भिम अनुयायावरिल सुडबुद्धीने लावलेले गुन्हे मागे घेण्यात यावे.व इतर मागण्यासाठी एक दिवसीय धरणे अंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा महासचिव डा नरेश इंगळे, राजीव दारोकार,मधुकर जुमडे.जे.एस.शिंदे,निलेश  भोजने,पी.एस.खंदारे,अंनत तायडे,माजी आमदार पुरूषोत्तम राजगुरू,वसंता राठोड, वसंता मुसळे,आत्माराम भगत,समाधान भगत,गौतम वैद्य,भिमराव खंदारे,वसंता हिवराळे,विजय मनवर,एड.डी.डी.गुडदे,डि. एन. गायकवाड,हरिदास बन्सोड,सुखदेव काजळे, आत्माराम सुतार आदींची उपस्थिती होती.धरणे अंदोलनाचे संचालन निलेश भोजने यांनी तर आभार पी एस खंदारे यांनी मानले.
blank