वेतनाविना गेली प्राथमिक शिक्षकांची होळी

0
10

गोंदिया,दि.4 : प्राथमिक शिक्षकांना जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांचे वेतन मिळाले नाही. दोन महिन्यांचे वेतन न झाल्यामुळे रंगांचा सण म्हणून साजरा करण्यात येणारा होळीचा सण शिक्षकांसाठी मात्र बेरंगी झाला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने वेतन करण्यासंदर्भात होळीच्या चार दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
शालार्थ वेतन प्राणली बंद पडल्यामुळे जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे वेतन झाले नाही. त्यामुळे शासनाने ८ फेब्रुवारी रोजी आॅफ लाईन वेतन काढण्याचे आदेश दिले होते. परंतु शिक्षण विभागाने आॅफ लाईन वेतन केले नाही. त्यामुळे शिक्षकांचा होळीचा सण बेरंगी झाला आहे. या संदर्भात मुकाअ. राजा दयानिधी, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अ.क. मडावी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देणाºया शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे, विभागीय अध्यक्ष नूतन बांगरे, सरचिटणीस अनिरूध्द मेश्राम, अय्युब खान, वाय.एस. मुंगुलमारे, पवन कोहळे, जी.सी. खाराबे, घनश्याम कावळे, विनोद लिचडे, एस.एम.पंचभाई, माणिक घाटघुमर, चंदू दमाहे यांचा समावेश होता.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षीत, सरचिटणीस एल.यू.खोब्रागडे, संचालक किशोर डोंगरवार, संदीप तिडके, एन.बी.बिसेन, प्रदीप रंगारी, दिलीप लोधी, पी.एन.बडोले, गजानन पाटणकर, व्ही.जी. वालोदे, विलाश डोंगरे, डी.व्ही.बहेकार, संदीप मेश्राम व सतीश दमाहे यांनी मुकाअ राजा दयानिधी, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अ.क. मडावी यांना निवेदन दिले.