37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांना अटक

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांना अटक

0
18

blank

अमरावती,दि.09 : भातकुलीच्या बीडीओला मारहाण करणाºया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांना गुरुवारी दुपारी अटक करण्यात आली. माहिती मिळताच शिवसेना कार्यकर्त्यांसह जि.प. अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांनी ठाण्यात धाव घेतली. उपाध्यक्षांना जि.प. अध्यक्षांच्या कक्षातून दुपारी ताब्यात घेण्यात आले. न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
ढोमणे यांना अटक करण्यात येऊ नये, यासाठी जिल्हा परिषद पदाधिकाºयांनी पोलिसांना विनंती केली. मात्र, गाडगेनगर पोलीस त्यांच्या अटकेवर ठाम राहिल्याने काही शिवसैनिकांसोबत पोलिसांची शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान बीडीओ सागर पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश वानखडे, शहरप्रमुख प्रशांत वानखडे, सहसंपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी, आशिष धर्माळे यांनी गाडगेनगर ठाण्यात ठिय्या दिला. चर्चेअंती पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायचा की कसे, याबाबत निर्णय घेण्यात येईल, असा पवित्रा गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी घेतला.ढोमणे यांच्याविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी बुधवारी रात्री भादंविच्या कलम ३५३, ५०४, ५०६, ३२३, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. बीडीओ सागर पाटील यांना त्यांच्या कार्यालयात शिरून मारल्याचा आरोप ढोमणे यांच्यावर आहे. गुरुवारी महसूल अधिकारी कर्मचाºयांनी पाटील यांच्या समर्थनार्थ बंद पुकारल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांवर दबाव आला होता.

blank