गोरेगाव, दि.१0-स्थानिक नगर पंचायत कार्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नगराध्यक्षा सिमाताई कटरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
यावेळी नपं सदस्य व बांधकाम सभापती शामली जयस्वाल, पाणी पुरवठा सभापती हिरन झंझाड, महिला व बाल कल्याण सभापती शोभा लटये, नगरसेवक सुरेश रहांगडाले, रविंद्र चन्ने, रेवेंद्र बिसेन, मलेशाम येरोला, सयाबाई मारबते, मधूमाला साखरे, चंद्ररेखा कांबळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी महिला दिनानिमित्त नगराध्यक्षा कटरे, नगरसेविका झंझाड, सभापती जयस्वाल व मलेशाम येरोला यांनी माहिती देऊन मार्गदर्शन केले. संचालन व आभार लक्ष्मीकांत खोब्रागडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगर पंचायतीचे अधिकारी व सर्व कर्मचाèयांनी सहकार्य केले.




