विस्तारीत न्यायालयाच्या इमारतीचा शिलान्यास ११ मार्च रोजी

0
8
गोंदिया,दि.१0- जिल्हा न्यायालय गोंदियाच्या नव्या विस्तारीत इमारतीचे भूमिपूजन शिलान्यास ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता वरिष्ठ न्यायमुर्ती भूषण गवई यांच्या हस्ते जिल्हा न्यायाधीश कमलाकार कोठेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
न्यायिक दृष्टीकोनातून जिल्हा न्यायालयाची इमारतीत कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही. तेव्हा अनेक वर्षानंतर न्यायालयाच्या इमारतीचे विस्तार करणे आवश्यक होते. त्तेव्हा याबाबद गोंदिया जिल्हा अधिवक्ता संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. पराग तिवारी यांनी उच्च न्यायालय नागपुरच्या खंडपीठात जनहीत याचिका घातली होती. तेव्हा जिल्हा न्यायालयाच्या मागील भाग न्यायालयाला प्राप्त झाल्यानंतर जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीत इमारतीचे भूमीपूनज करण्यात येत आहे. तेव्हा आयोजित कार्यक्रमाला जिल्ह्यातील वकील संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.