26.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ ऐका भाजपा महापौरांची अधिकाऱ्याला शिवीगाळ…

ऐका भाजपा महापौरांची अधिकाऱ्याला शिवीगाळ…

0
27
अकोला,दि.10:- करवाढीच्या मुद्यावर अडचणीत सापडलेल्या भाजपा नेत्यांचा राग अनावर झाला असून महापालिक सहाय्यक कर अधीक्षक नंदकिशोर उजवणे याना महापौर विजय अग्रवाल यांनी शिवीगाळ केली.त्यानंतर आयुक्तांच्या दालनात माजी नगरसेवक सागर शेगोकार यानी मारहाण केली. यामुळे मनपा कर्मचारी संतप्त झाले आहेत. मंगळवारी रात्री हा प्रकार झाला. दरम्यान महापौर विजय अग्रवाल यांना मंगळवारी खुर्ची फेकून मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या कर विभागातील नंदकिशोर उजवणे यांना माजी नगरसेवक सागर शेगोकार यांनी खुर्ची मारल्याची घटना आयुक्तांच्या दालनात झाली. या घटनेने संपुर्ण राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. स्थायी समिती सभापती बाळ टाले यांनी महापौर यांच्यावर हल्ला होवू दिला नाही.
आयुक्त वाघ यांच्या दालनात महापौर विजय अग्रवाल, नंदकिशोर उजवणे यांच्यात तत्पुर्वी जोरदार वादावादी झाली. या वादावादीत उजवणे यांनी महापौरांनी अंगावर खुर्ची फेकून मारण्याचा प्रयत्न केला. तो बाळ टाले यांनी परतावून लावला. भाजपा सभागृह नेत्या गितांजली शेगोकार यांचे पुत्र व माजी नगरसेवक सागर शेगोकार यांनी आयुक्तांच्या दालनात नंदकिशोर उजवणे यांना खुर्ची मारली. तत्पुर्वी भाजपा महापौरांनी अशी उजवणे यांना शिवीगाळ केली. अखेर नंदकिशोर उजवणे यांनी आयुक्त जितेंद्र वाघ यांना राजीनामा दिला. यासंदर्भातील शिवीगाळीचा ऑडीओ पुढे आला आहे.