34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ मंगरुळपीर येथे हिंदुमुस्लीम एकतेचे घडले दर्शन

मंगरुळपीर येथे हिंदुमुस्लीम एकतेचे घडले दर्शन

0
33

blank

आकाश पडघन*
वाशिम -दि. 15 जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील पंचक्रोशीत नावाजलेले बिरबलनाथ संस्थानच्या वतीने मुस्लीम धर्माच्या पविञ ऊर्स शरीफला आलेल्या फकीरांचे स्वागत बिरबलनाथ संस्थेच्या वतीने करण्यात आले.हिंदु-मुस्लीम धर्मीयांच्या एकतेचे आणी बंधुभावनेचे प्रतिक असलेली वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर नगरी आहे.सर्व धर्मीयांच्या सण ऊत्सवामध्ये मोठ्या ऊत्साहाने सहभागी होत सर्वधर्मीय लोक एकता आणि बंधुभावनेचे दर्शन घडवतात.अशाच मुस्लीम धर्मियांच्या पवित्र ऊर्स शरीफमध्ये नाथ नगरीत आलेले फकीरबाबा यांचे सत्कार करण्य़ात आले. बिरबलनाथ महाराज संस्थानचे सचिव रामकुमार रघुवंशी, ऊत्तम पाटील,मुकुंदसिंह रघुवंशी, दिनेश बोरकर,राजुभाऊ खंडेतोड,योगेश रघुवंशी, बाबा जहागीरदार आदीं उपस्थित होते.

blank