गोंदिया रेल्वेस्थानकावरील समस्यांचे मुख्य रेल्वे प्रचलन प्रंबधकांना निवेदन

0
13
गोंदिया,दि.15ः- गोंदिया रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांना होणा-या विविध समस्येचे त्वरित निराकरण करण्याकरिता एस.ई.रेल्वे नागपूर झोन डी.आर.यु.सी.सी.चे माजी सदस्य
  आसीफ इकबाल  अंसारी यांनी गोंदियाच्या धावत्या दौ-यावर आलेले दक्षिण पूर्व मध्य रेल्वे- बिलासपुरचे अप्पर मुख्य प्रचलन प्रबंधक यांना   गोंदिया स्थानकावरील समस्यांचे  त्वरित निराकरण करण्याकरिता विविध मागण्यांचे निवेदन नुकतेच दिले आहे. आसिफ   इकबाल अंसारी यांनी दिलेल्या निवेदनात गाडी क्रमांक ५८२०६ इतवारी-रायपुर पैसेंजर दररोज गोंदिया वरून जाण्याची वेळ  १०-१५ निश्चित आहे. त्याचप्रमाणे क्रमांक ६८७४२ गोंदिया-दुर्ग  पैसेंजर दररोज गोंदिया वरून  सुटण्याची वेळ  १७ -४०  निश्चित आहे.  १०-१५ ते  १७-४०  च्या  दरम्यान  प्रवाश्यांना  दुर्ग रायपुर जाण्याकरिता इतर कोणतीही पैसेंजर ट्रेन नसल्यामुळे  प्रवाश्यांना असुविधा होत आहे.   तसेच बिरसोला  रेल्वे  स्थानकावर एकच  तिकीट  काउंटर असल्यामुळे तिकीट काढण्याकरिता प्रवाश्यांना त्रास होतो.बिरसोला येथे  पादचारी पुल नसल्यामुळे  रेल्वे प्रवाश्यांना  रेल्वेरूळ पार करून  तिकीट काउंटर  गाठावे लागते. यामुळे यावेळेवर एखादी ट्रेन आल्यास कधीही  अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  याकरिता  उपरोक्त समस्या  प्रवाश्यांच्या सोयी करिता उपलब्ध करून देण्याची मागणी  आसिफ अंसारी यांनी  दिलेल्या निवेदनातून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे अप्पर मुख्य प्रचलन  प्रबंधक डॉ. एस.एन. मुखर्जी  यांना दिले आहे. सदर समस्याचे वाचन करून अप्पर मुख्य प्रचलन प्रबंधक  डॉ. एस.एन. मुखर्जी यांनी सदर समस्याचे निराकारण करण्याचे आश्वासन  डी.आर.यु.सी.सी.चे माजी सदस्य आसिफ इकबाल अंसारी यांना दिले आहे.