23.2 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home गुन्हेवार्ता सुपर एक्स्प्रेस हायवेवरील विहिरीत युवतीचा मृतदेह

सुपर एक्स्प्रेस हायवेवरील विहिरीत युवतीचा मृतदेह

0
25

अमरावती दि.१७ःः-बडनेराला जाणाऱ्या सुपर एक्स्प्रेस हायवेलगतच्या एका विहिरीत शुक्रवारी दुपारी एका युवतीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली. दरम्यान, शुक्रवारी रात्रीपर्यंत मृतक युवतीची ओळख पटली नव्हती.रहाटगाव रिंग रोडपासून बडनेराच्या दिशेने अवघ्या दीड किमी. अंतरावर अजमिरे यांचे पडीक शेत आहे. याच शेतात एक विहीर असून, या विहिरीजवळ नेहमीच दारुडे बसतात. तसेच काही आक्षेपार्ह वस्तूसुद्धा विहिरीजवळ मिळून आल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. याच विहिरीत शुक्रवारी दुपारच्या सुमारास एका युवतीचा मृतदेह असल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले.