24.6 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home राजकीय जनतेचा विश्वासघात करणार्याला धडा शिकवा – डॉ. कोठेकर

जनतेचा विश्वासघात करणार्याला धडा शिकवा – डॉ. कोठेकर

0
31

सडक अर्जुनी,,दि.१९:- ज्यांना जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिले त्यांनी जनसमस्या सोडविण्याऐवजी स्वत:च्या स्वार्थी राजकारणासाठी जनतेचा व पक्षाचा विश्वासघात केला. अशा विश्वासघातकी व अहंकारी लोकांना जनता चांगल्याने ओळखते त्यांच्यामुळे या क्षेत्रात पुन्हा लोकसभेची निवडणूक होण्याची वेळ आली आहे. अशा स्वार्थी, संधीसाधू लोकांना धडा शिकविण्याकरिता कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे असे प्रतिपादन विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी केले.
ते १५ मार्च रोजी येथील मातोश्री लान मध्ये आयोजित भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा विस्तारित बैठकीत बोलत होते. जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीत प्रामुख्याने माजी खासदार डॉ खुशाल बोपचे, माजी आमदार भेरसिंग नागपुरे, गोंदिया नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी जि प अध्यक्ष नेतराम कटरे, जिल्हा महामंत्री संघटन वीरेंद्र अंजनकर,महिला मोर्चा प्रदेश सचिव सीता रहांगडाले,जि प कृषी व पशुसंवर्धन सभापती शैलजा सोनवाने, जिल्हा महामंत्री भाऊराव उके, लायकराम भेंडारकर, रविकांत बोपचे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम, महिला मोर्चा प्रदेश सदस्य सविता पुराम,रचना गहाणे, उपस्थित होते.
पुढे बोलतांना कोठेकर म्हणाले कि 6 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी मुंबईत भाजपा महामेळावा होणार आहे. यामेळाव्यास भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार असून संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व लोकप्रतिनिधीनी उपस्थित राहण्यासंबधीचे नियोजन करावे.प्रास्ताविकेतून जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी जिल्हयातील विस्तार योजनेसंदर्भात माहिती देऊन मार्गदर्शन केले. सभेचे संचालन जिल्हा महामंत्री रविकांत बोपचे यांनी केले. या वेळी सर्व तालुका अध्यक्ष, आघाडी अध्यक्ष, लोकप्रतिनिधी व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

blank