37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता नागपूर जि.प.चे पंचायत डेप्युटीसीईओ एसीबीच्या जाळ्यात

नागपूर जि.प.चे पंचायत डेप्युटीसीईओ एसीबीच्या जाळ्यात

0
38

blank

नागपूर,दि.11ः-नागपूर जिल्हा परिषदेचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सखाराम निबांळकर(वय 57) यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याच कार्यालयात 50 हजाराची लाच स्विकारतांना दुपारी दीड वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले.कार्यालयातील तपासणीनंतर निंबाळकर यांना एसीबीच्या चमूने अटक करुन चौकशीसाठी नेले आहे.सोबतच त्यांच्या निवासस्थानाची झडती सुरु केली आहे.तक्रारदार ग्रामसेवक भिवापूर पंचायत समितीतंर्गत चिचाळा येथे कार्यरत असून गटग्रामपंचायत नांद येथीलही प्रभार आहे.दरम्यान गटग्रामपंचायत नांद येथील 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाल्याप्रकरणाच चौकशी सुरु असून सदर चौकशीप्रकरणाची फाईल बंद करण्याकरीता 1 लाख रुपयाची मागणी करण्यात आली होती.तक्रारदार ग्रामसेवकास रक्कम द्यायची ईच्छा नसल्याने भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.त्या तक्रारीच्या आधारे आज सापळा रचून कारवाई करण्यात आली.

blank