ग्रामसेवक नैकानेने केली सात लाखाची अफरातफर

0
6

गोरेगाव दि.11 – येथील पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या झांजियाचे ग्रामसेवक वाय एस नैकाने यांनी नरेगाच्या व्यक्तीगत शौचालय बांधकाम कुशल काम अनुदानातील 7 लाख २५ हजार रुपयांची अफरातफर केल्याची तक्रार सरपंच उषा दिहारी यांनी (दि.१० मे) रोजी गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे यांच्याकडे केल्याने खळबळ माजली आहे.

या प्रकरणाची तक्रार सरपंच उषा दिहारी यांनी गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे यांना केली असता हे प्रकरण गंभीर आहे. निलंबीत ग्रामसेवक वाय एस नैकाने यांना देता येत नाही. दुसरा ग्रामसेवक बघेले यांना प्रभारी ग्रामसेवक म्हणुन दिला आहे त्याच्या नावानी बँकेत खाते काढण्यात आले नाही व निलंबीत ग्रामसेवक वाय एस नैकाने यांनी ग्रामपंचायतचे रेकॉर्ड जमा केले नाही. यामुळेच हे प्रकरण घडले असावे. वैयक्तिक लाभाची रक्कम इतर कामाकरीता वळते करता येत नाही, हे अफरातफरीचा प्रकरण आहे. यामुळे गटविकास अधिकारी यांच्या नावाने तक्रार टाकल्यास पोलिसात तक्रार करतो, असी सुचना दिल्याने सरपंच उषा दिहारी यांनी गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे यांना १० मे रोजी तक्रार केली.

जय दुर्गा बिल्डींग ही संस्था कोणाची आहे, सात लाख २५ हजार रुपये कोणत्या कामाचे दिले या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी केल्यास अनेकजण या प्रकरणात येतील, असी चर्चा झांजियावासी करीत आहेत.यशवंत पंचायत समिती पुरस्कार प्राप्त पंचायत समिती अंतर्गत असे अफरातफरीचे प्रकरण होत आहेत. असे अनेक प्रकरण होऊ शकतात. पण ते प्रकरण उजेडात आले नाहीत. एकटा ग्रामसेवक असी अफरातफर करु शकत नाही. यात मोठे मासे असल्याची चर्चा तालुक्यात होत आहे. या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. पिडीत महीला आदिवासी सरपंच उषा दिहारी यांना न्याय देण्यात यावा. अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सुरेश साठवणे, संजय कटरे व गावकऱ्यांनी केली आहे.