25 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ चिचडोह बॅरेजमध्ये दोन मुले बुडाल्याची भीती

चिचडोह बॅरेजमध्ये दोन मुले बुडाल्याची भीती

0
25

गडचिरोली, दि..२४:चामोर्शी नजीकच्या चिचडोह बॅरेजमध्ये दोन किशोरवयीन मुले बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले असून, शोधमोहीम राबविण्यात येत आहे.चामोर्शीपासून ८ किलोमीटर अंतरावर चिचडोह बॅरेज बांधण्यात आला असून, या बॅरेजचे काम पूर्ण झाले आहे. काही महिन्यांपूर्वीच या बॅरेजची चाचणीही घेण्यात आली. त्यामुळे धरणात भरपूर पाणीसाठा आहे. हे मोठे व या भागातील पहिलेच बॅरेज असल्याने अनेक जण ते बघण्यासाठी जात असतात. दरम्यान काल जयनगर येथील काही मुले हे बॅरेज बघण्यासाठी गेले होते. मात्र दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात आपल्याकडे कुठलीही तक्रार आली नाही. परंतु पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती चामोर्शी पोलिसांनी दिली.